मालेगाव ठरतंय राज्यातील कोरोनाच “हॉटस्पॉट”

नाशिक : मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे राज्यातील नवीन कोरोना “हॉटस्पॉट” बनलं चालले आहे. या शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मालेगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ वर जाऊन पोहोचली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मालेगावमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मालेगावकारांनी दाखवलेला निष्काळजीपणा, प्रशासनाची उदासीनता अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण संचारबंदी असतानाही शहरातील अनेक भागात लोकांचा मुक्त संचार पाहायला मिळत होता. ज्या भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तो या परिसरातील झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात दाट लोकवस्ती आहे. त्यात अधिक प्रमाणात यंत्रमाग कामगार राहतात, तर काही भाग हा चांगले सुशिक्षित, यंत्रमाग मालक नागरिक राहत असलेल्या भाग आहे.

मालेगाव हे यंत्रमाग कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. शहरात सुमारे २ लाख यंत्रमाग असून तितकेच त्यावर काम करणारे मजूर आहे. यंत्रमाग काम करणाऱ्या कामगारांमध्ये टीबीरोग जास्त प्रमाणात आढळतो. धाग्याचे बारीक-बारीक कण नाका तोंडाद्वारे शरीरात जाऊन फुफ्फुसं निकामी करतात आणि कोरोना ही फुफ्फुसावर अटॅक करत असल्याने या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यासाठी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ . सईद फाराणी यांनी सांगितले आहे.

या शहरातील मोमीनपुरा, कमालपुरा, मदिना बाग, इस्लामाबाद, आझाद नगर, दत्त नगर या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. तरच कोरोनाला आळा बसण्यास मदत होईल.

कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग असून तो म्हणजे सरकार आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करणे. त्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडा.अन्यथा बाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी जनतेला केले आहे.

शहरात कोरोना बधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली असून ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत त्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी २५० पथक स्थापन करण्यात आले आहेत. युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिकांची मदतही घेणार असल्याचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांची संख्या

मोमीनपुरा – १३
कमालपुरा – ११
नयापुरा -०५
अक्स कॉलनी – ०३
गुलाब पार्क – ०२
मदिना बाग – ०२
नूर बाग – ०२
अपना सुपर मार्केट – ०१
हजार खोली – ०१
इस्लामाबाद – ०२
खुसमत पुरा – ०१
बेल बाग – ०२
मोतीपुरा – ०१
आझाद नगर – ०१
दत्त नगर – ०१
एकूण – ४८

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा