मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२२: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. खर्गे यांना ७,८९७ मते मिळाली. त्याचवेळी शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली. तर ४१६ मते रद्द झाली आहेत. १७ ऑक्टोबर रोजी एकूण ९३८५ नेत्यांनी मतदान केले होते. दरम्यान, थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे अनुभवी नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यात अध्यक्षपदासाठीची चुरस होती. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? हे आज झालेल्या मतमोजणीअंती स्पष्ट झाले आहे. तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम येच्युरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते.

थरूर यांनी केले खर्गे यांचे अभिनंदन!

शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खर्गे यांचे अभिनंदन केले. काँग्रेसचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाची आणि जबाबदारीची बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मल्लिकार्जून खर्गे यांना या कामात पूर्ण यश मिळो. तसेच या निवडणुकीत एक हजार पेक्षा जास्त नेत्यांचा पाठिंबा मिळणे हीच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्टी आहे… असे ही शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

सोनिया गांधी, प्रियंका वाड्रा यांनी घेतली खर्गे यांची भेट!

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या देखील उपस्थित होत्या.

राहुल गांधी यांच्या मल्लिकार्जुन खर्गेंना शुभेच्छा

मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, आंध्र प्रदेशातील भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेसच्या अध्यक्षांनी काय निर्णय घ्यावा, यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. माझी काय भूमिका असेल, यावर मल्लिकार्जुन खर्गे निर्णय घेतील.

समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण!

काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विजयानंतर काँग्रेस समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा