गोल पोस्ट राष्ट्रीय ममता बॅनर्जींनी आडवाणींना दिल्या शुभेच्छा

ममता बॅनर्जींनी आडवाणींना दिल्या शुभेच्छा

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या ९२ व्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा दिल्या. ट्विटर वरून ममता बॅनर्जी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थनाही केली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले अडवाणी यांनी २००२ ते २००४ पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. २०१५ मध्ये त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version