विरोधकांच्या एकजुटीचा “नितीश फॉर्म्यूला” ममता म्हणाल्या, मला अहंकार नाही !

कोलकत्ता, २५ एप्रिल २०२३: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी राजकीय पक्षांची एकजुट करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सरसावले आहेत. विरोधी पक्षांच्या एकवाक्यतेसाठी त्यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकत्ता येथे मंत्रालयात भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, आम्ही आगामी निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत आम्ही चर्चा केली. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन २०२४ लोकसभा निवडणूकीची रणनीती आखावी लागणार आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत तोपर्यंत रणनीती तयार होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप विरोधातील सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र येण्यास कोणताही आक्षेप नाही, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. आता सर्व पक्षांनी एकत्र येण्यासाठी बिहारमध्ये बैठक व्हावी. यानंतर भविष्यातील रणनीती ठरवता येईल. अशी अपेक्षाही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा