राज्य परिवहनच्या बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला ३ महिने तुरुंगवास

नागपूर, २ ऑगस्ट २०२३: राज्य परिवहनच्या बस चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून ३ महिने तुरुंगवासची शिक्षा सुनावली. आरोपी संजय पुंडलिकराव हळबे (वय ३१, रा. ओमनगर, सक्करदरा ) हा दोषी असल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाचे चालक बाळू विश्वासराव ठाकरे (५१) बस क्र. एमएच-४०/९६०७ या बसने नागपूरहून गडचिरोलीकडे जात होते.

उमरेड रोडवरील सक्करदरा बसस्थानकाजवळ संजयने अचानक बस थांबवली. बाळूने त्याला बाजूला होण्यास सांगितले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र, बाळू यांना बसमधून खाली उतरवल्यानंतर संजयने बेदम मारहाण केली. चालकाच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपनिरीक्षक डी. एस. निकम यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.पवार यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील आर.जी.डागोरिया हे आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाले. न्यायालयाने संजयला दोषी ठरवून ३ महिन्यांची शिक्षा सुनावली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा