‘तुलिका आर्ट गॅलरी’च्या व्यवस्थापिका डॉ. वर्षा सोनकर यांच्या हस्ते ‘स्मृतीरंग ७५’च्या ‘पुष्प १४’चे उद्घाटन

चिंचवड, ३० डिसेंबर २०२२ : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीचे चित्रशिल्पहस्त कला विभागप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या कल्पनेतून स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना आपल्या कलेद्वारे अभिवादन करण्याचे योजिले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रत्येक आठवड्यात चार कलासाधक असे २० आठवड्यांत एकूण ७५ कलासाधक आपली कला रसिकांसमोर प्रदर्शित करणार आहेत.

स्मृतीरंग ७५ (पुष्प १४) या पिंपरी-चिंचवड परिसरातील सात कलाकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. २७ डिसेंबर २०२२) सायंकाळी सहा वाजता ‘तुलिका आर्ट गॅलरी’च्या व्यवस्थापिका डॉ. सौ. वर्षा सोनकर यांच्या शुभहस्ते झाले.

संस्कार भारतीच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. सर्व सहभागी कलासाधकांनी दीपप्रज्वलन केले. डॉ. सौ. वर्षा सोनकर यांचे स्वागत समितीच्या सचिव सौ. लीना आढाव यांनी केले; तसेच सर्व सहभागी कलाकार १) सौ. पूर्वा रानडे, २) तमन्ना पाल, ३) भक्ती म्हेत्रे, ४) मधुरा जाधव, ५) सार्थक टेहरे, ६) अनन्या आचार्य, ७) आयुष वाघमारे यांचे डॉ. सौ. वर्षा सोनकर यांनी पुष्प देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सौ. वर्षा सोनकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्वांना त्यांनी सांगितले, की तुमच्या भावना, कल्पना, तुमचे निरीक्षण कागदावर व्यक्त करा. सतत काम केल्याने तुमची एकाग्रता वाढेल. तुमच्यात प्रगती होईल. कुणाची नक्कल करू नका. कलासाधक हा शब्द योग्य आहे. कारण तपस्या, साधना केल्यानेच तुम्ही कलाकार व्हाल. या कामातूनच तुम्हाला आनंद मिळेल. आपली सवत:ची शैली निर्माण करा. त्यांनी सर्व कलाकारांच्या कामाचे कौतुक केले.

समितीचे चित्रशिल्पहस्त कला विधेच्या सहसंयोजिका सौ. सारिका सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सदर कार्यक्रमासाठी चित्रशिल्पहस्तकला विभागप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, कलासाधक व कलारसिक उपस्थित होते.

स्मृतीरंग ७५ (पुष्प १४ वे) हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. एक डिसेंबर २०२३) सकाळी ११ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी पी. एन. गाडगीळ कलादालन, चिंचवडगाव येथे विनामूल्य खुले आहे. तरी जास्तीत जास्त रसिकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वातंत्र्याच्या व रंगांच्या दुनियेत रंगून जावे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा