नवी दिल्ली, दि.१३ जून २०२०: आडियन काँसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आईसीएमआर) ने एक महत्त्वाचे मार्गदर्शक सूचनापत्रक जारी केले आहे. त्यानुसार आपल्या शहरात लॉकडाऊन असो किंवा नसो आपल्याला या ६ महिन्यापासून ते येत्या वर्षापर्यंत जगण्याच्या सवयी बदलाव्या लागणार आहेत . आयसीएमआरने आपल्या नव्या नियमांमध्ये नव्या आयुष्याचा २१ स्रोतांना समाविष्ट केले आहे.
■ किमान २ वर्ष तरी परदेश वारी करावयाची नाही. किमान १ वर्ष बाहेरचे काहीही खाऊ नये.
■ कोणत्याही लग्न समारंभात सामील होऊ नये.
■ देशामध्ये देखील अनावश्यक प्रवास करू नये.
■ वर्षभर तरी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
■ सामाजिक अंतर पूर्णपणे पाळावे.
■ सर्दी खोकला असणाऱ्यांपासून लांबच राहावं.
■ चेहऱ्यावर मास्क नेहमीच ठेवावा.
■ या वर्तमान परिस्थितीत सावधगिरी बाळगावी.
■ इतर कोणास आपल्या जवळ येऊ देऊ नका.
■ वर्षभर शाकाहारी जेवण खावे.
■ किमान ६ महिने चित्रपटगृहे , मॉल किंवा वर्दळीच्या ठिकाणी, बाजारपेठेत जाऊ नये. बागेत किंवा कोणत्याही समारंभात जाऊ नका.
■ आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करावयाचे आहे.
■ सलून किंवा सौंदर्यप्रसाधनात (ब्युटी पार्लर) मध्ये जाताना सावधगिरी बाळगा.
■ कोणत्याही माणसाशी अनावश्यक भेट करू नका.
■ लक्षात ठेवा की कोरोनाचे विषाणूचे संकट लवकरच जाणार आहे.
■ बाहेर जाताना घड्याळ, अंगठी आणि बेल्ट वापरू नये.
■ टिशू पेपर आणि सेनेटायझर आपल्या जवळ नेहमीच बाळगावे.
■ बाहेरून आल्यावर आपले जोडे पादत्राणे बाहेरच ठेवावे.
■ बाहेरून जाऊन आल्यावर आपले हात पाय धुऊन घ्या किंवा अंघोळ करा.
■ ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपण एखाद्या संक्रमिताच्या संपर्कात आला आहात तर त्वरित स्नान करावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावे.
■ या सर्व नियमांना किमान वर्षभर तरी गाठ बांधून ठेवा.
न्युज अनकट प्रतिनिधी