मानधन घेण्याच्या बाबतीत प्रविण तरडे “नंबर वन”

मुंबई : आजकाल मानधनाच्या बाबतीत प्रवीण तरडे हे आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मराठीतला सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार म्हणून प्रवीण तरडे यांची चर्चा सध्या सुरू आहे. अशी माहिती समोर आली आहे.
प्रवीण तरडे हे एका सिनेमकासाठी जवळपास ५० लाखांचं मानधन घेतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिनेता स्वप्निल जोशी चित्रपटासाठी ४५ ते ५० लाख मानधन घेतो, सई ताम्हणकर २० ते २५लाखांचं मानधन घेते अशी माहिती समोर आली होती. अंकुश चौधरी २५ लाख मानधन घेतो.

सोनाली कुलकर्णी १५ ते १९ लाखांच्या घरात मानधन घेते. उमेश कामत १९ लाख रुपये मानधन घेतो. अमृता खानविलकर १० ते १५ लाख रुपये मानधन घेते. प्रिया बापट ८ ते १० लाख मानधन घेते. तर सुबोध भावे १५ ते २० लाखांचे मानधन घेतो. मात्र या सगळ्यांमध्ये तरडे जास्त मानधन घेतात. त्यांनीच मुळशी पॅटर्न या सिनमेची कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन हे केलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा