मंगळवारी होणार राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर

नवी दिल्ली: लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यसभेत ते मंजूर करण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवारी संसदेमध्ये ३११ मतांनी हे विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपने आपल्या पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांना १० आणि ११ डिसेंबर रोजी व्हिप जारी केला आहे. मंगळवारी राज्यसभेत मतदानासाठी हे विधेयक मांडले जाऊ शकते, असा शक्यता आहे.
यापूर्वी सोमवारी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. रात्री उशीरापर्यंत या विधेयकावर चर्चेनंतर दुपारी ११.४५ च्या सुमारास मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. या विधेयकाच्या बाजूने एकूण ३११ मते देण्यात आली, तर विरोधकांना केवळ ८० मते मिळू शकली. विशेष म्हणजे नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि रामविलास पासवान यांच्या पक्षाने या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. याशिवाय शिवसेना, बीजद आणि वायएसआर कॉंग्रेस सारख्या गैर-भाजपा पक्षांनीही या विधेयकाच्या बाजूने मतदान केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा