आंबा काजू बागायतदारांचें रत्नागिरीत साखळी उपोषण

6

रत्नागिरी १२ डिसेंबर २०२३ : रत्नागिरीत २०२२-२३ हंगामात पीक नुकसानीमुळे फक्त १२% हापूस उत्पादन झाले, परंतु दुसरा हंगाम आला तरी शासनाने अजून मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक कलमा मागे पंधरा हजार रुपये प्रमाणे सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. या उपोशणात कोकण हापूस आंबा उत्पादक, विक्रेते यांच्यासह अनेक आंबा बागायतदार सहभागी झाले आहेत.

हिवाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास प्रारंभ केला आहे. कोकण हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थचे प्रकाश उर्फ बाबा साळवी, रामचंद्र मोहिते, दीपक राऊत, टी एस घवाळी, मंदार जोशी, जगन्नाथ पाटील, अजय गांधी यांच्यासह अनेक आंबा बागायतदार यात सहभागी झाले.

जिल्ह्यात २०१५ पासून थकीत कर्ज असलेल्या व नियमित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख नऊ हजार इतकी आहे तर १४१०.०६ कोटींचे कर्ज आहे. त्यापैकी ११,३२६ शेतकऱ्यांची २२३.८६ कोटींची थकबाकी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा