मंगोलियाने चीनशी संलग्न असलेली सीमा केली बंद

19

मंगोलिया(वृत्तसंस्था): मंगोलियाने चीनशी संलग्न असलेली सीमा पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या चीनमधून येणाऱ्या वाहनांना तसेच येथील लोकांना तेथे पुर्णपणे प्रवेश देखील बंद करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. चीनमध्ये करोना व्हायरसमुळे जो हाहाकार माजवला आहे. त्याची लागण आपल्या देशातील नागरीकांना होऊ नये यासाठी त्यांनी ही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगोलियाने आपल्या देशातील सार्वजनिक कार्यक्रमांवर आणि उत्सवांवरही काही काळासाठी बंदी लागू केली आहे. तसेच दक्षतेचा उपाय म्हणून चीन सीमेलगतच्या शाळाही काहीं काळ बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. मंगोलियात अजून तरी या विषाणुचा प्रादुर्भाव झालेला रूग्ण आढळून आलेला नाही.
दरम्यान, मंगोलियाशी संलग्न असलेल्या चीनी हद्दीतील काहीं भागापर्यंत या विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यानंतर आमच्या सरकारने ही दक्षतेची उपाययोजना केली आहे असे त्या देशाच्या उपपंतप्रधानांकडून सांगण्यात आले आहे. मंगोलियातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर २ मार्च पर्यंत बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.