कोलंबिया एशिया हॉस्पिटल आणि विक्रम हॉस्पिटल्स आता मणिपाल हॉस्पिटल्स समूहाचे भाग आहेत. रिब्रँडिंग मणिपालच्या आधुनिक उपस्थितीवर भर देण्यासोबत रूग्ण अपेक्षा करू शकणा-या उच्च दर्जाच्या, व्यावसायिक सेवांना देखील दाखवते.
रिब्रँडिंग आणि नवीन लोगोच्या लाँचसह मणिपाल हॉस्पिटल्सच्या सर्व २७ शाखांसोबत कोलंबिया हॉस्पिटल्स आणि विक्रम हॉस्पिटल एकाच छताखाली येतील. देशभरातील कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स व विक्रम हॉस्पिटल ‘मणिपाल हॉस्पिटल’ म्हणून रिब्रँडिंग करण्यात येतील. या रिब्रँडिंगमुळे ओळखीमध्ये बदल होईल, पण दर्जात्मक आरोग्यसेवा देण्यावरील भर कायम राहिल.
नवीन ओळखीचे अनावरण करत रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त, पुणे म्हणाले, ”कोलंबिया एशिया हॉस्पिटल नेहमीच उच्च दर्जाची आरोग्यसेवा व सामुदायिक सेवा देण्यामध्ये अग्रस्थानी राहिले आहे. मला खात्री आहे की, हॉस्पिटलच्या रिब्रँडिंगमुळे वैद्यकीय क्षमता आणि समाजाला व्यापक प्रमाणात उच्च दर्जाची उपचार सेवा देण्याप्रती असलेली कटिबद्धता अधिक दृढ होईल.”
हॉस्पिटलचे रिब्रँडिंग आणि नवीन लहान लिपीमधील लोगोमधून हॉस्पिटलची वैद्यकीय कौशल्य, विश्वसनीयता व व्यावसायिकतेची सातत्यपूर्ण प्रतिमा दिसून येण्यासोबत रूग्ण, फिजिशियन्स, कर्मचारीवर्ग आणि जनतेच्या घेत असलेल्या काळजीचे स्वरूप देखील दिसून येते. भविष्याकडे पाहता नवीन ब्रँडिंग आणि लोगो वैद्यकीय ज्ञान वाढवण्याप्रतीच्या प्रबळ समर्पिततेला सादर करतील.
”आम्हाला मणिपाल हॉस्पिटल्स समूहाचा भाग होण्याचा आनंद होत आहे. आम्हाला एक टीम म्हणून उच्च मानकांची रूग्ण काळजी व वैद्यकीय कौशल्य सेवा देण्याचा अभिमान वाटतो. आमच्या डॉक्टरांचा या व्यापक विस्तारासह शहराच्या आरोग्यसेवा गरजांवर मोठा प्रभाव पडेल,” मुरली राव, हॉस्पिटल संचालक, मणिपाल हॉस्पिटल्स खराडी यांनी सांगितले.
कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स आणि मणिपाल हॉस्पिटल्स दीर्घकाळापासून उल्लेखनीय सामुदायिक सेवा प्रदाता राहिले आहेत आणि विलीनीकरणापासून देशाची दुसरी सर्वात मोठी हॉस्पिटल साखळी बनले आहेत. १५ शहरांमध्ये २७ हॉस्पिटल्स, ७,६०० हून अधिक बेड्स, ४,००० हून अधिक प्रतिभावान डॉक्टरांचा समूह आणि ११,००० हून कर्मचारीवर्गासह मणिपाल हॉस्पिटलस समूह आता दरवर्षाला चार दशलक्षहून अधिक रूग्णांचा उपचार करणार आहेत. या एकीकरणासह हॉस्पिटल्स प्रत्येक रूग्णाला सर्वात किफायतशीर व सर्वोत्तम हेल्थकेअर सेवा देण्याप्रती सातत्याने काम करणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस