मनीष सिसोदिया यांना आजही जामीन मिळाला नाही, १२ मेपर्यंत राहणार तुरुंगात

8

दिल्ली २७ एप्रिल २०२३ : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारु घोटाळ्याप्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. वास्तविक, दिल्लीच्या नवीन अबकारी धोरणाच्या सीबीआय प्रकरणात मनीष सिसोदिया यांना कोर्ट रूममध्ये हजर करण्यात आले. मात्र, आज सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी संपली आहे. आता न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने त्यांना तुरुंगातच राहावे लागणार. दारु घोटाळा प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ मे पर्यंत वाढ केली.

मनीष सिसोदिया हजर असताना त्यांच्या वकिलाने सांगितले की, सीबीआय प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, राऊस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआयला उद्यापर्यंत मनीष सिसोदिया यांना आरोपपत्राची ई-प्रत देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे याआधी या खटल्याची सुनावणी झाली तेव्हा सीबीआयने म्हटले होते की, सिसोदिया यांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात.

दरम्यान, मनीष सिसोदिया यांना सीबीआयने १२ फेब्रुवारी रोजी दारू घोटाळ्यात अटक केली होती. मात्र, यापूर्वी सीबीआयने सिसोदिया यांची अनेक तास चौकशी केली होती. मात्र, नंतर तपासात असहयोग दाखवून सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अटक केली. यानंतर सीबीआयने त्यांची कोठडी रिमांडमध्ये चौकशी केली. त्याचवेळी तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा