मांजरा धरण शंभर टक्के भरण्याच्या जवळ; प्रशासनाचे सतर्क राहण्याचे आव्हान

कळंब, १४ ऑक्टोबर २०२२: उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालूक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, धारुर, लातुर या शहरांना पाणीपुरवठा करणारे हे धरण आहे. मांजरा धरण ९१ टक्के भरले आहे. बारा ते चोवीस तासांत मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज धरणाचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले आहे.

सध्या मांजरा धरणात १२२.९१ घनमीटर / सेकंद आवक आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस आसाच सूरु राहीला तर संध्याकाळपर्यंत मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरेल, यामुळे शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरुन पाण्याचा विसर्ग कधीही होऊ शकतो.

याबाबत लातूर पाटबंधारे विभागाने पत्र काढून उस्मानाबाद, बीड, बिदर जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. तसेच कळंबचे तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी सर्व तलाठींनाही याबाबत सुचना केल्या आहेत आणि नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी येण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे.

गेल्या वर्षी मांजरा धरणातून भरपुर प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे सौदणा येथे हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले होते. तर वाकडी येथे एनडीआरएफची टीम बोलवावी लागली होती. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा