अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स लीग मध्ये मनमाडच्या मुलींची सुवर्णकामगिरी

मनमाड, नाशिक ८ नोव्हेंबर २०२३ : त्रिचूर केरळ येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स लीग मध्ये काल पहिल्याच दिवशी मनमाड च्या छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हीने तीन सुवर्णपदक पटकावले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने ४५ किलो वजनी गटात युथ जूनियर व सीनियर या तिन्ही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत, स्नॅच मध्ये ६२किलो, क्लीन जर्क मध्ये ७३ किलो वजन असे एकूण १३५ किलो वजन उचलून प्रभावी कामगिरी केली.

छत्रे विद्यालयाच्या दिव्या उपेंद्र सोनवणे हिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत ४० किलो वजनी गटात सहभागी होत स्नॅच मध्ये ४८ किलो व क्लीन जर्क मध्ये ५२ किलो क्लीन जर्क असे १०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तसेच वीणा संतोष आहेर हीने ४५ किलो ज्युनियर्स मध्ये ५७ किलो स्नॅच व ७६ किलो क्लीन जर्क १३५ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. पूजा श्याम वैष्णव हिने ४९ किलो वजनी गटात ६७ किलो स्नॅच व ८२ किलो क्लीन जर्क असे १४९ किलो वजन उचलून ज्युनियर मध्ये रौप्यपदक पटकावले.

खुशाली निवृत्ती गांगूर्डे हिने ४९ किलो सीनियर्स मध्ये सहावा क्रमांक मिळविला. विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे देवून गौरविण्यात आले. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे..

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा