मंत्रिमंडळ विस्ताराआधी राष्ट्रवादीचे नाराजीनाट्य

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (दि.३०) रोजी होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे. अशी चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात उधाण सुरु झाले आहे.

आमदार मकरंद पाटील यांना डावल्यामुळे वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह याठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आपल्या पदांचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

सोमवारी सुरुर येथील किसनवीरांच्या पुतळ्यासमोर सर्व समर्थक आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. यावेळी लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल
मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा