गोल पोस्ट राष्ट्रीय माणुसकीचा उत्तम दाखला

माणुसकीचा उत्तम दाखला

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. आजही हे दोन देश एकमेकांचे शत्रू म्हणूनच ओळखले जातात. परंतु आता एक उत्तम माणुसकीचा दाखला या दोन देशांमध्ये अनुभवता येणार आहे
. गुरूवारी(दि.१४) रोजी अशी एक घटना घडली ज्याचे प्रत्येकाला कौतुक करावेसे वाटेल. जयपूरहून ओमानची राजधानी मस्कटसाठी १५० प्रवाशांना घेऊन विमान निघाले. परंतु अचानक झालेल्या विजांच्या कडकडाटात हे विमान सापडले.
त्यामुळे हे विमान २ हजार फूट खाली आले. त्यानंतर परिस्थिती लक्षात घेत वैमानिकाने अलर्ट जारी केलं आणि क्षणाचाही विलंब न करता पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने सक्रिय होत विमानाला धोक्यातून बाहेर आणले. त्या विजांच्या कडकडाटामुळे पाकिस्तानात गुरूवारी २० जणांचा मृत्यू झाला होता.
याबाबत ‘द न्यूज इंटरनॅशनल’ च्या वृत्तानुसार या विमानात १५० प्रवासी होते. विमानाने गुरूवारी कराची क्षेत्रावरून उड्डाण भरलं होते. तेव्हाच आकाशात अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि ३६ हजार फूट उंच असलेला विमान थेट ३४ हजार फुटांवर येवून पोहोचला.

परिणामी वैमानिकाला आपत्कालीन प्रोटोकॉल जारी करावा लागला. ज्यामुळे जवळच्या कक्षांमध्ये धोक्याची सूचना मिळाली. त्यानंतर पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रणेकडून महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली. जोपर्यंत विमान त्याच्या पूर्वस्थितीत येत नाही तोपर्यंत पाकिस्तानचे हे मदत कार्य सुरू होते.

error: Content is protected !!
Exit mobile version