गोल पोस्ट महाराष्ट्र ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अक्षर कोठारी अडकला विवाहबंधनात, शेअर केले खास फोटो

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अक्षर कोठारी अडकला विवाहबंधनात, शेअर केले खास फोटो

Akshar Kothari Wedding Photoshoot: २०२५ या वर्षात मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपल्या लग्नगाठ बांधली. त्यामध्ये आत्ता आणखी एक नाव वाढलं असुन लक्ष्मीच्या पावलांनी’ फेम अद्वैत चांदेकर म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारीने गुपचूप लग्न उरकले आहे. त्याच्या खऱ्या आयुष्यातील ‘कला’सोबत 20 जून रोजी त्याने लग्नगाठ बांधली. अभिनेत्याने सोशल मीडियावर थेट फोटो शेअर करत चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. त्याने लग्नसोहळ्यातील काही गोड क्षण शेअर केले आहेत. अक्षरने सारिका खासनिस हिच्याशी लग्न केले असून, त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असेही म्हटलंय की ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे.

अक्षरने इन्स्टाग्रामवर पत्नी सारिका खासनीस बरोबरचे लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत Then, Now and Always असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने ‘बचपन का प्यार’ हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार ‘SaAkshar’ हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे.

अक्षरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने ऑफ व्हाईट रंगाचा सूट आणि तयाची पत्नी सारिकाने अबोली रंगाची साडी परिधान केली आहे. या फोटोंमध्ये अक्षर आणि सारिका दोघेही आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षरची पत्नी सारिकाबद्दल सांगायचं झालं तर, ती Scientist असल्याची माहिती आहे. सारिकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये Scientist असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, अक्षरने शेअर केलेल्या फोटोखाली मालिकेतील सहकलाकार तसंच इंडस्ट्रीतील इतर अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.आकाश नलावडे, ईशा केसकर, अपूर्वा नेमळेकर, दीपाली पानसरे, दिव्या पुगांवकर, समृद्धी केळकर, अभिजीत खांडकेकर, ऋतुजा बागवे, गिरिजा प्रभू, रेश्मा शिंदे यांसह अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्समध्ये त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अक्षरच्या अनेक चाहत्यांनीही त्याला अभिनंदन म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर

error: Content is protected !!
Exit mobile version