ज्या भाषेने सगळं दिल तिच्यासाठी दोन शब्द बोलण्यासही या दोन दिग्गज कलाकारांचा नकार!

Marathi Language Controversy Veteran Actors Refusal
दिग्गज कलाकारांचा नकार;

Marathi Language Controversy Veteran Actors Refusal: सध्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलच तापलंय यावरून ठाकरे बंधूंचा मेळावा देखील झाला.त्यानंतर आत्ता मराठी सिनेनाट्यसृष्टीतले दोन दिग्गज कलाकार म्हणजेच अशोक सराफ आपल्या सर्वांचे लाडके मामा ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान झाला. आणि ज्यांची मराठी सिनेसृष्टीत बच्चन अशीदेखील ओळख आहे.आणि दुसरे म्हणजे ज्यांच्या अभिनयाला रसिकप्रेक्षक कायमच दाद देतात ज्यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं अर्थात प्रशांत दामले..या दोन्ही दिग्गज कलाकारांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला. सध्या महाराष्ट्रात मराठी बोलण्याबाबतचा आग्रह वाढताना दिसतोय. हिंदीचा राग नाही पण मराठीचं प्रेम असल्याने स्थानिक भाषेला महत्व देण्याची मागणी वाढतेय. अशात या दोन्ही कलाकारांनी याबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय.

नेमकं घडलं काय ?

नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात अशोक सराफ आणि प्रशांत दामले यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्या आला. त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पत्रकारांनी अशोक सराफ यांना मराठी हिंदी मुद्द्यावर बोलायला सांगितलं. मात्र त्यांनी बोलायला नकार दिला तर प्रशांत दामले यांना हा प्रश्न विचारताच त्यांनी आता वेळ नाही हा बोलायची. हा प्रसंग काय आहे, आनंदाचा प्रसंग आहे. हे कुठून काढताय मध्येच असं म्हणत याबद्दल बोलायला नकार दिलाय. मराठी सिनेसृष्टीत, मराठी भाषेत काम करूनही अशोक सराफ यांनी मराठी मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला.असल्याने यानंतर आत्ता प्रेक्षक मात्र त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. चांगलेच पांग फेडले तुम्ही मराठीचे, ज्या भाषेने सगळं दिलं त्यावर बोलायला तयार नाहीत, आजपासून यांचे चित्रपट पाहणं बंद अशा तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षक देताना दिसतायत.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर