युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू…

युक्रेन, २० ऑक्टोबर २०२२ : युक्रेन आणि रशिया यांच्यातले युद्ध निवळण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे आता हे युद्ध कुठल्या वळणावर येऊन ठेपणार, हे माहित नाही. पण रशिया मात्र आक्रमक स्वरुपात पुढे जात आहे. रशियाच्या पुतीन यांनी युक्रेनच्या काही भागात मार्शल लॉ लावण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे युक्रेनच्या काही भागात कर्फ्यु लागण्याचे संकेत मिळत आहे. लोहानत्सक, डोनेत्सक, झापुर्झिया आणि खेरसन हे चार शहर जे रशियाने बेकायदेशीरपणे हल्ला करुन मिळवले, त्यावर आता रशिया स्वत:चे अधिकार स्थापन करणार आहेत.

या संदर्भात एका भारतीय दुतावासाने संकेत जारी केले असून, त्यानुसार युक्रेनमधल्या स्थानिक लोकांना युक्रेन सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जे भारतीय युक्रेन किंवा त्याच्या आसपास जाणार आहेत, त्यांनीही या भागात न जाण्याचे आदेश दुतावासाने दिले आहे.

सध्या रशिया आक्रमक रित्या युक्रेनवर हल्ल्याचा भडिमार करत असून युक्रेनची स्थिती खालावत आहे. नुकताच रशियाने युक्रेनवर ड्रोन हल्ला सुरु केला. त्यामुळे युक्रेनची ताकद कमी होत आहे. सहा जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ही दुर्देवी गोष्ट आहे.

नुकतीच पुतीन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत जाहीर केले की, वरील चार राज्यांमध्ये मार्शल लॉ लागू केला जाईल. त्या संदर्भात क्रेमलिन यांनी जारी केलेल्या हुकूमावर पुतिन यांनी स्वाक्षरी केल्याने आता युक्रेनमधील परीस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत नाही, हे सत्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस