मानेर, बिहार १८ जून २०२० : गलवान खो-यात १६ जून रोजी चिनी सैन्यासह झालेल्या हिंसक चकमकीत आपला प्राण गमावणा-या हवालदार सुनील कुमार यांचे अंतिम संस्कार गुरुवारी बिहारच्या मनेर भागात करण्यात आले.
देशाच्या सेवेत आपला जीवाचे बलिदान देणा-या सैनिकाच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. हवालदार सुनील यांचे पार्थिव आज पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.
यापूर्वी पटना विमानतळावर शहिद सैनिकांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि अनेक पक्षांच्या नेत्यांसह मंत्र्यांनी विमानतळावर पुष्पांजली वाहिली.
१६ जूनला लडाखच्या गालवान खो-यात झालेल्या हिंसक सामन्यात कर्नल रँक
अधिका-यासह भारतीय लष्कराच्या २० जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते .
बिहार रेजिमेंटचे शहिद हवालदार सुनिलकुमार यांच्या पार्थिवास त्यांच्या १० वर्षाच्या मुलाने मुखाग्नी दिला , त्यावेळेस तेथे उपस्थिति लोकांनी ‘ भारत माता की जय ‘ व ‘ सुनिलकुमार अमर रहे ‘ च्या घोषणा दिल्या. तसेच बंदुकीच्या फैरी झाडून पण त्यांना अंतिम सलामी देण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी