शहीद जवान ऋषिकेश जोंधळेंचं पार्थिव मूळ गावी दाखल, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर, १६ नोव्हेंबर २०२०: जम्मू काश्मीरमध्ये सीमा भागात पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारात शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथले ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आलं. पुढं अंत्यसंस्कारांसाठी या दोन्ही जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.

एकीकडं सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडं शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचं पार्थिव बहिरेवाडी या त्यांच्या मूळ गावी दाखल झालंट आहे. जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य लोक जमा झाले आहेत. त्यांच्या शौर्याला अखेरचा सलाम करण्यासाठी आज अनेक लोक त्यांच्या गावी दाखल झाले आहे. सोमवारी म्हणजेच एकिकडं भाऊबीजेचा दिवस सुरु झालेला असतानाच दुसरीकडं मात्र जोंधळे कुटुंबावर भलतीच शोकळा पसरली. बहीण- भावाच्या नात्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा भाऊबीजेच्या याच दिवशी जोंधळे यांच्या बहिणीच्या नशीबी मात्र नियतीनं हा दिवस लिहिला होता.

अवघ्या २० व्या वर्षी वीरमरण

ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा