मारुतीने अचानक लॉन्च केली ही कार , सर्वाधिक मायलेजचा दावा

Maruti Dzire CNG Launch, 9 मार्च 2022: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने मंगळवारी बाजारात त्यांच्या प्राइम सेडान डिझायर ची सीएनजी आवृत्ती लॉन्च केली आहे. प्रिमियम सेडान डिझायरची सीएनजी आवृत्ती लॉन्च करून, मारुतीने या विभागात आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

इतके मिळेल मायलेज

कंपनीच्या S-CNG तंत्रज्ञानासह येणारी नवीन Dzire K-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT 1.2L इंजिन (मारुती डिझायर इंजिन) सह लॉन्च करण्यात आली आहे. हे इंजिन 57kw ची पीक पॉवर आणि 98.5 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीने दावा केला आहे की नवीन डिझायर सीएनजी 31.12 किमी/किलो मायलेज देईल. ही देशातील सर्वात किफायतशीर आणि सर्वात शक्तिशाली सीएनजी सेडान असल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीने सुरू केले बुकिंग

सोमवारी, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की कंपनीने या कारची अनऑफिशियल पद्धतीने बुकिंग सुरू केली आहे. दुसऱ्याच दिवशी कंपनीने ही कार लॉन्च केली.

जाणून घ्या या कारची किंमत

मारुती डिझायर VXI आणि ZXI रूपे S-CNG तंत्रज्ञानासह येतील. Dzire VXI CNG (Maruti Dzire VXI CNG price) ची एक्स-शोरूम किंमत रु. 8.14 लाख असेल आणि Dzire ZXI CNG (Maruti Dzire ZXI CNG price) ची किंमत रु. 8.82 लाख असेल.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग अँड सेल्स) शशांक श्रीवास्तव म्हणाले, “जस जग हरित भविष्याकडे वाटचाल करत आहे, तसतसे मारुती सुझुकी ग्रीन विहिकलच्या वाढत्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. परिवर्तनशील तंत्रज्ञानासह, अधिकाधिक ग्राहक शोधत आहेत. त्यांच्या गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी S-CNG वाहनांवर स्विच करण्याचा प्रयत्न चालू आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा