गोल पोस्ट अर्थ उद्योग मारुती सुझुकी कमी किमतीत विकत आहेत आपल्या सेकंड हॅन्ड गाड्या

मारुती सुझुकी कमी किमतीत विकत आहेत आपल्या सेकंड हॅन्ड गाड्या

नवी दिल्ली, दि. २५ मे २०२०: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी केवळ नवीन कारची विक्रीच करीत नाही, तर वापरलेल्या कार ची Truevalue च्या माध्यमातून विक्री देखील करते. यावेळी डिजायर आणि वॅगनआर सारख्या कार Truevalue च्या अधिकृत वेबसाइटवर अगदी कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या कारची सुरूवातीची किंमत फक्त १.४० लाख रुपये आहे, तर मग या कार्स बद्दल जाणून घेऊया.

• मारुती इको : कंपनीची प्रसिद्ध इको व्हॅन कारही येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ही ५ सीटर कार २०१६ चे मॉडेल असून आतापर्यंत ही कार ६१,९८२ कि.मी.पर्यंत चालली आहे. ही कार तिच्या पहिल्या मालकाद्वारे विकली जात आहे. कंपनी या कारसह १ वर्षाची वॉरंटी आणि ३ विनामूल्य सर्व्हिसिंग देखील देत आहे. तीची किंमत फक्त २.९९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

• मारुती स्विफ्ट डिजायर: देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट सेडान कार डिजायरही या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही पेट्रोल आवृत्तीचे एन्ट्री लेव्हल वैरिएंट आहे. दिलेल्या माहितीनुसार, ही कार २०१६ सालची मॉडेल असून आतापर्यंत ही कार १,५०,२३२ किमी धावली आहे. ही कार तिच्या पहिल्या मालकाद्वारे विकली जात आहे. तिची किंमत २,३० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

• मारुती वॅगनआर : ही यादीतील सर्वात स्वस्त कार आहे. मारुतीची टेल बॉय म्हणून ओळखली जाणारी फ्लॅगशिप हॅचबॅक कार वॅगनआर देखील या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार २०१० मॉडेलची असून आतापर्यंत ८५,००० किमी चालली आहे. ही तिच्या पहिल्या मालकाद्वारे विकली जात आहे आणि तिची किंमत केवळ १.४० लाख रुपये निश्चित केली गेली आहे.

टीपः येथे कारविषयी नमूद केलेल्या सर्व गोष्टी Truevalue वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version