मारुती सुझुकीची MPV Invicto कार लॉन्च

6

नवी दिल्ली, ६ जुलै २०२३ : इंडो-जपानी ऑटोमेकर मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित ‘MPV Invicto’ बाजारपेठेत लाँच केली आहे. सुझुकी आणि टोयोटा यांच्यात करार म्हणून तयार केलेली ही कार विद्यमान टोयोटा इनोवा हाय क्रॉसवर आधारित आहे. अत्यंत आरामदायी, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम असणाऱ्या या कारची स्पर्धा किया कार्निव्हल आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या सारख्या कारबरोबर केली जाणार आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या या कारचा लुक आणि डिझाईन टोयोटा इनोव्हा हायक्रॉससारखीच आहे. पण, मारुती सुझुकीने आपल्या बंपरमध्ये विशिष्ट बदल केले आहेत. MPV Invicto चे बुकिंग हे १९ जूनपासूनच सुरू झाले आहे. पण या कारची अधिकृत किंमत जाहीर होण्यापूर्वीच ६,२०० पेक्षा अधिक गाड्यांची बुकिंग झाली आहे.

मारुती सुझुकी या MPV कारमध्ये सुरक्षेच्या विषयात कंपनीने पुरेपूर काळजी घेतली आहे. यामध्ये स्टँडर्ड फीचर्स म्हणून ६ एअरबॅग्ज, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ३ पॉइंट सीट बेल्ट, फ्रंट-रिअर डिस्क ब्रेक, एबीएस, हिल होल्ड, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि ३६० डिग्री व्ह्यूचा समावेश आहे. अजुन कॅमेरा, एअर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फिचर्स आहेत.

मारुती सुझुकी MPV Invicto चे केबिन ऑल ब्लॅक थीम आहे. कारमध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कारची मधली सीट पॉवर ऑट्टोमन विशेष आहे. कंपनीने ते Chimpanzee Gold Accent सह सादर केले आहे, ज्यामध्ये सॉफ्ट टच प्रीमियम इन्स्ट्रुमेंट पॅनल लेदर सीट्स तसेच अॅम्बियंट लाइटिंगसह पॅनोरॅमिक सनरूफ आहेत. इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास ७-८ सीट कॉन्फिगरेशन, मेमरीसह ८ वे पॉवर ड्रायव्हर सीट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, रिअर डोअर सनशेड्स, ड्युअल झोन एसी, IR कट विंडशील्ड, पॉवर्ड टेलगेट, ३६० डिग्री मॉनिटरसह सनशेड्सचा समावेश आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो पॉवरट्रेन
Invicto २.०-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे बनली आहे आणि मजबूत हायब्रीड परिपूर्ण टेक्नॉलॉजी सह येते. मारुतीने ही एमपीव्ही हायब्रिड पॉवरट्रेनसह सादर केली आहे. ज्याचे इंजिन ६००० आरपीएम वर ११२ kWh चा पॉवर आणि ४४०० rpm वर १८८Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये उपस्थित असलेली इलेक्ट्रिक मोटर ४००० rpm वर ८३.७३ kW ची पॉवर आणि २०६ Nm टॉर्क जनरेट करते. Invicto तीन ड्राइव्ह मोडसह येते यात सामान्य, स्पोर्ट आणि इको तसेच ती ९.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते. कंपनीचा असा दावा आहे की, ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये प्रति लिटर २३.२४ किमी प्रति लिटरचे मायलेज देऊ शकेल. तसेच इंधन टाकीची क्षमता ५२ लीटर आहे.

कारची बुकिंग २५,००० रुपयांच्या टोकन रकमेसह आधीपासूनच सुरू झाली असून या कारची किंमत २४.७९ लाख रुपये पासून सुरू होते आणि २८.४२ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी झेटा+ ७ सीटर व्हेरिएंटमध्ये २४.७९ लाख रुपये, झेटा+ ८ सीटर व्हेरियंटमध्ये २४.८४ लाख रुपये आणि अल्फा+ ७ सीटर व्हेरिएंटमध्ये २८.४२ लाख रुपयांमध्ये विकेल. ह्या सर्व एक्स -शोरुम किमती आहेत.

ऑल न्यू Invicto च्या लॉन्चिंग इव्हेंट दरम्यान मारूती सुझुकीने अधिकृतपणे उघड केले की, या कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. मारुती सुझुकीकडे Invicto च्या दहा हजार युनिट्सचा स्टॉक आधीपासूनच असुन Invicto चे उत्पादन कर्नाटक राज्यातील टोयोटाच्या बिदादी प्लांटमध्ये केले जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा