नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२० : मारुती सुझुकी कंपनी भारतीय बाजारपेठेत लवकरच मारुती कंपनीची 800 cc इंजिनची ‘बजेट’ कार लाँच करणार आहे. मारुती सुझुकीची नवीन 800 cc इंजिनची कार भारतीय बाजारात ऑल्टो 800 ला रिप्लेस करणार आहे. नवीन कार HEARTECT-K प्लेटफॉर्मवर आधारित असणार आहे. याचा वापर S-Presso आणि नवीन Wagon R मध्ये केला जावू शकतो.
पॉवर : नवीन कार जे ४७ बीएचपीचे पॉवर आणि ६९ एनएमचे टॉर्क जनरेट करते. तसेच मॅन्यूअल आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशन सोबत लाँच होणार आहे.
तुलना : मारुतीच्या या नवीन कारची टक्कर ‘रेनॉ क्विड’ सोबत होणार असून यामध्ये अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट तसेच पॉवर विंडो असणार आहे.
त्यासोबतच ड्यूल फ्रंट एयरबँग्स, ABS सोबत EBD, रिवर्स पार्किंग, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट यासारखे फीचर्स देण्यात येणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी