माशांचा मृत्यू

मुंबई : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा येथील कोटुंबी नदीवर शनिवारी (दि.९) रोजी संध्याकाळी शॅम्पूचा टँकर पलटी झाला आहे. त्यामुळे नदीच्या परिसरात सफेद रंगाचे १० ते १२ फूटांचे फेसाचे डोंगर तयार झाल्याचे पाहायला मिळाले. समोरून आलेल्या दुचाकीला चुकवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या टँकरमध्ये कोणतेही रसायन नव्हते. हा टँकर फक्त शॅम्पू घेऊन चालला होता. अशी माहिती कासा पोलीस स्थानकांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण सूर्या नदीचे पाणी किती प्रदूषित झाले किंवा झालेच नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.
आरोग्य विभागाकडून सुद्धा याबाबत कुठलीच माहिती दिली गेली नाही. स्थानिकांनी आणि तेथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांनी ह्या भल्या मोठ्या सफेद रंगाच्या फेसाच्या डोंगराचा आनंद लुटला आणि सेल्फी देखील काढल्या.पण यामुळे अनेक मासे आणि जीवजंतू मृत पावले आहेत. हे फुगे पाहण्यासाठी स्थानिकांनी मासे एकच गर्दी केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा