लोहारा : तालुक्यातील वडगांव वाडी या छोट्याशा खेडेगावात प्रशासनाचे काटेकोरपणे पालन करीत आज रोजी गावातील युवकांच्या पुढाकाराने मदतीचा हात या ग्रुपच्या माध्यमातून गावात कोरोनाचे संसर्ग टाळण्यासाठी मास्क व हॅन्ड वॉश वाटप करून सामाजिक हित जोपासले असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सध्या देशात कोरोना संसर्ग महामारीने थैमान घातले असून हा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून ग्रामीण भागातील सर्व गावे व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. कोरोनाची साथ गावात पसरू नये याची दक्षता घेत गावातील युवकांनी ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत मास्क व हॅन्ड वॉश वाटप केले.
यापूर्वी “हिचे पुत्र आम्ही ” “हिचे पांग फेडू” या उक्ती प्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गावातील सार्वजनिक विविध कामात या मदतीचा हात या ग्रुप कढून हातभार लावण्यात आले आहे.
या मास्क वाटपासाठी एकूण पंच्यांनव हजार रुपये खर्च करण्यात आले असून हा निधी सदस्यातून गोळा करण्यात आला.
गावात भाजी पाला विक्री नागरिकांत व्युव करून विक्री केली जाते. या उपक्रमात विष्णू बेळे,दयानंद पाटील, कल्लेेश्वर भुजबळ, बालाजी बोडके, काशीनाथ रड्डे,कल्याणी भुजबळ, अमोल भुजबळ, शिवराणी भुजबळ, शंकूतला बचाटे,सुप्रिया भुजबळ, सह आदींनी परिश्रम घेतले.

