गोल पोस्ट गुन्हा अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन दिवस होऊन गेले असूनही कोणताही गुन्हा दाखल...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन दिवस होऊन गेले असूनही कोणताही गुन्हा दाखल नाही

लातूर, २१ ऑक्टोबर २०२०: दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी घडल्याचे समोर आले. पीडीतेची प्रकृती अतिशय खालावलेली असून, लातूरच्या सरकारी रुग्णालयात तिला पुढील उपचाराकरिता करण्यात आलेले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामधील एका मोठ्या गावात ही घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केलेल्या चार आरोपींचे वय १६ /१७ या वयोगटातील आहे. संबंधित चार आरोपींनी सोमवारी या मुलीवर पाळत ठेवली, आणि दुपारी तिच्यावर सामुहिकपणे अत्याचार केला. यानंतर, पीडीतेची प्रकृती खालावल्याने तीच्या पालकांनी तिला तेथीलच स्पर्श ग्रामीण रुग्णालयात उलट्या जुलाब होत असल्याचे कारण सांगून दाखल केले. मात्र, डॉक्टरांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पीडीतेला विश्वासात घेऊन तीची चौकशी केली, दरम्यान तीने चौघांनी मिळून अत्याचार केल्याचे डॉक्टरांना सांगितले. या सर्व प्रकरणाची माहिती तेथील स्थानिक पोलीसांना मिळाल्यावर पीडीत मुलीला पुढील उपचाराकरिता लातूर मधील शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. पीडीत मुलीच्या पालकांकडे महिला सह पोलीस निरीक्षक तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या असता पालकांनी एफ आय आर नोंदवली नसल्याचे पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांनी सांगितले.

हे प्रकरण होऊन आज तीन दिवस झाले;परंतु, अजून कोणताही गुन्हा याबाबत दाखल करण्यात आलेला नाही. पीडीत मुलीची प्रकृती ही गंभीर असून तिच्यावर शासकीय रुग्णालय, लातूर येथे अजूनही उपचार चालू आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version