गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

जम्मू , १ फेब्रुवारी २०२३ :बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील अफ्रावत शिखरावर प्रचंड हिमस्खलन झाल्याची घटना घडली असून, यामध्ये काही परदेशी स्कीअर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्टच्या वरच्या भागात हे हिमस्खलन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून, या घटनेत आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १९ परदेशी पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.

बारामुल्ला पोलिसांनी सांगितले की, ‘गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्टच्या वरील भागात असणाऱ्या अफ्रावत शिखरावर हिमस्खलन झाले आहे. सध्या बारामुल्ला पोलिसांसह इतर यंत्रणांकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा