आंध्रातील विझागमधील केमिकल फॅक्टरीत भीषण आग

आंध्र प्रदेश, दि. १४ जुलै २०२०: आंध्र प्रदेश विझाग जिल्ह्यातील फार्मा कंपनीला भीषण आग लागली आहे . ही आग इतकी भयंकर होती की जवळपास राहणाऱ्या लोकांनी त्याचा मोठा स्फोट ऐकला आणि अनेक लोक या आगीत भाजले देखील आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत, परंतू आगीची दाहकता परिस्थितीच्या दृष्यांतून समोर येत आहे. आगीत भाजलेल्या लोकांना गजूवाका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय बचाव कार्य देखील सुरू आहे.

अग्निशमन दलाव्यतिरिक्त पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात विनाविलंब नेण्याचे काम सुरू आहे. आगीच्या ज्वाला दूरवरुन पाहिल्या जाऊ शकतात. ही आग एवढी भयंकर आहे की दुरूनच याचा अंदाज येतो. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाची १२ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्फोट व आग पाहून स्थानिक लोक घराबाहेर पडले. घटनेच्या वेळी युनिटमध्ये फक्त ४ लोक उपस्थित होते आणि ते सुखरुप बाहेर आले आहेत, असे डीसीपी म्हणाले. या घटनेत आतापर्यंत कुणाचा मृत्यू झालेला नाही. अग्निशामक दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अग्निशमन विभागासह प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक निरीक्षक, एसीपी आणि डीसीपी घटनास्थळी पोहोचत आहेत आणि सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत.

घटनेची माहिती देताना डीसीपी म्हणाले की, ज्वाला रिॲक्टरमधून आल्या आणि पसरल्या. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी युनिटमध्ये फक्त चारच लोक उपस्थित होते आणि आपला जीव वाचविण्यासाठी त्यांनी तेथून पळ काढला. विशाखापट्टणमचे सी पी , आर. के. मीणा यांनी स्वत: संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवले आहे आणि सतत त्याचे निरीक्षण करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा