बोरिवली पश्चिम मध्ये एका शॉपिंग सेंटरला भीषण आग

4

मुंबई, दि. ११ जुलै २०२०: मुंबईच्या बोरिवली वेस्टमधील शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या होत्या आणि आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होत्या. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही सकाळी लागली असल्यामुळे तेथेलोक उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

मुख्य अग्निशमन अधिकारी पी. एस. रहंगदाळे यांनी म्हणाले, “आग आता शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्यावर पसरत चालली आहे. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांबरोबरच फायर रोबोटही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येत्या दोन तासांत आग नियंत्रणात येईल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा