मुंबई, १३ फेब्रुवारी २०२३ :मुंबई येथील मालाडमधील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही भीषण आग मालाड पूर्व जामरुशी नगरमध्ये लागली. झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथून ती पसरली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी घरेलू गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अजूनही ही आग आटोक्यात आलेली नसून, या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.