हिंगणा एमआयडीसीत भीषण आग, तिघांचा मृत्यू ; अनेक कामगार अडकले!

नागपूर, २५ एप्रिल २०२३: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसीत ऍग्रो प्रा.लि इंडस्ट्रीजला काल दुपारी भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर किमान २५-३० कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन विभागाचे १० बंब घटनास्थळी कार्यरत असून कामगारांना बाहेर काढण्यासाठी तसेच ही तासभरापांसून घुमसणारी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवान प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.

हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा.लि. या कंपणीत आग लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता ही आग नियंत्रणात आली आहे.

या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसीलदार प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा