कुर्ल्यात गोदामांना भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२२: मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील गुलाम शाह इस्टेटमधील काही गोदामांना पहाटे भीषण आग लागली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यामध्ये एलबीएस मार्गावरील गुलाब शहा इस्टेटमधल्या गोदामांना भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा ते पंधरा बंब घटनास्थळी दाखल झाले असूनआग विझवण्याचा प्रयत्न करीत होते.

तब्बल तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर कुर्ला येथील आग वीजवण्यात आली. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक इत्यादी साहित्यांच्या गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा