कल्याण-शिळफाटा रस्त्यावर होणार मास्टिक तंत्राचा वापर

कल्याण, दि. २१ जुलै २०२०: कल्याण-शिळफाटा रस्त्याचे नाव ऐकल की प्रवाशांच्या भूवया गोळा होतात कारण लांबच लांब गाड्याच्या रांगा आणि त्यात दुहेरी ट्रफिक यामुळे गाडीचालक आणि प्रवासी हैरान होतात आणि यात १२ महिने भर पडते ती खड्डयांची . त्यामुळे या महामार्गाबद्दल सतत तक्रारीचा पाऊस असतो. दरवर्षी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलं जाते मात्र ऐन पावसाळ्यात नागरिकांना या खड्ड्यात आपली गाडी नाइलाजाने घालावी लागते .

कल्याण-शिळफाटा दुमार्गी रस्त्यावर सततच्या वर्दळीमुळे खड्ड्यांची संख्या ही वाढते आणि त्याचबरोबर अपघात होताना दिसत आहेत. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण-शिळफाटा २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील महत्त्वाच्या ठिकाणचे खड्डे मास्टिक अस्फाल्ट तंत्राचा वापर करून भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लांबच लांब गाड्यांची लागणारी रांग आणि अपघात टाळता येतील म्हणून हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी दिली. या कामासाठी ठेकेदार नियुक्त केला असून पावसाचा अंदाज घेऊन खड्डे भरण्याची कामे केली जातील, असे महामंडळाचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी सांगितले. मास्टिक तंत्राने खड्डे भरण्याचे तंत्र खूप महागडे आहे. त्यामुळे ठरावीक भागातील खड्डे या तंत्र साहाय्याने भरण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले

हा महामार्ग कल्याण डोंबिवलीला मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा आहे. त्यामुळे जड वाहनांची वाहतूक तसेच रोजच्या लहान मोठ्या वाहनांची वाहतूक याच रस्त्याने होते. रस्त्याच्या आजूबाजूने अनेक गावे असल्याने नेहमी रहदारी असते. त्यामुळे हे खड्डे नेहमीच्या डांबरी, पेव्हर ब्लॉक आणि खडी या तंत्राने बुजविले तरी पुन्हा नेहमीच्या ठिकाणी खड्डे पडत राहतात. हे खड्डे बुजविण्यासाठी यावेळी मास्टिक तंत्राचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी ठेकेदार नियुक्त केला असून पावसाचा अंदाज घेऊन खड्डे भरण्याची कामे केली जातील, असे महामंडळाचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी सांगितले. मास्टिक तंत्राने खड्डे भरण्याचे तंत्र खूप महागडे आहे. त्यामुळे ठरावीक भागातील खड्डे या तंत्र साहाय्याने भरण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले

न्यूज अनकट प्रतिनीधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा