मठाधिपती होण्याच्या वादातून पिसाळ महाराजांचा खून?

पंढरपूर : विठूरायाच्या एकादशीला पंढरीत आलेल्या दोन वारकरी महराजांमध्ये मठाधिपती होण्यावरून वाद झाला होता. या वादातुन ह.भ.प. जयवंतबुवा पिसाळ यांचा खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर येथील अनिल नगर परिसरात असलेल्या कराडकर मठात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील रहिवासी जयवंत बुवा पिसाळ आणि बाजीराव बुवा कराडकर यांच्या मध्ये मठाधिपती होण्यावरुन वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणांमध्ये झाले. आणि यातूनच बाजीरावबुवा कराडकर यांनी जयवंतबुवा पिसाळ यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
यामध्ये जयवंतबुवा पिसाळ हे कराडकर मठाचे विद्यमान मठाधिपती आहेत. तर बाजीरावबुवा कराडकर हे या मठाचे माजी मठाधिपती आहे. हा मठ हभप बंडातात्या कराडकर यांच्या संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा