पुणे, ३० ऑगस्ट २०२३ : टोळीयुद्धातील खून प्रकरणातील गुन्हेगार यल्ल्या आणि त्यांच्या इतर १९ साथीदारांवर पुणे पोलिसांनी अखेर मोक्का कारवाई केली आहे. नितीन म्हस्के खून प्रकरणातील यल्ल्या उर्फ सागर कोळणटी हा मुख्य आरोपी आहे. पुण्यातील मंगला टॉकीज बाहेर नितीन म्हस्के यांचा खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
तलवार, लोखंडी गज, काठ्या डोक्यात घालून नितीन म्हस्के यांचा खून केल्या प्रकरणी यल्ल्या उर्फ सागर कोळणटी आणि इतर साथीदारांसह गुन्हा दाखल झाला होता. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सूर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड अशी आरोपीची नावे आहेत. या सगळ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. या सगळ्यांवर आता संघटित गुन्हेगारी केल्याप्रकरणी मोक्का लावण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर