मी पत्रकार..

महिलांना गरज आहे स्वरक्षणाची, प्रशिक्षणाची

गेल्या काही दिवसात आपल्या देशभरात माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहून अत्यंत वाईट वाटले आहे. ह्या घटनांनंतर बरेच बांधव एकत्र येऊन सोशल मीडियावर आपले लोकेशन आणि मोबाईल नंबर देऊन आपल्या माता भगिनींचे संरक्षण करण्याचे मेसेजेस पाठवत आहेत. जेणेकरून आपल्या माताभगिनींवर संकटकाळी कधीतरी काहीतरी कुठेतरी मदत होईल. परंतु त्यांना गरज आहे ती स्व-रक्षणाची. त्यांना गरज आहे प्रशिक्षण देण्याची.

परंतु वाईट एका गोष्टीचे वाटते की, आपल्या देशात बऱ्याच माता भगिनी आहेत, संस्था आहेत, आश्वासनं देणारी पुढारी / नेतेमंडळी आहेत जे महिला संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात अथवा असे काही प्रयोजन करू शकतात. त्यापैकी एकही जण किंवा नेतेमंडळींपैकी कोणी किंवा ज्या मीडियावर फक्त चर्चा दाखवल्या जातात. त्यापैकी कोणीही पुढे येऊन माता भगिनींना स्व-स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढे सरसावले नाहीत.
माझ्या माता भगिनींना कोणी संरक्षण देण्यापेक्षा त्यांनाच स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले तर पुढे होणाऱ्या बऱ्याच वाईट घटना होण्यापासून वाचू शकतात. त्यामळे त्यांना स्व रक्षणाची जास्त गरज असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. बाकी बांधव तर आपल्या माता भगिनींना संरक्षण देण्यासाठी सदैव तत्पर आहेत आणि यापुढेही राहतील.

-धनंजय अलका अरविंद गवळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा