उस्मानाबाद येथे वैद्यकीय प्रवेश परिक्षा (NEET) केंद्र सुरू करण्यात यावे.

उस्मानाबाद, २८ जुलै २०२० : वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या या NEET प्रवेश परिक्षेसाठी उस्मानाबाद येथे प्रवेश परिक्षा केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे विनंती करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे केले असल्याचे सांगितले.

राज्यात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, आजही अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास टाळण्यासाठी राज्य सरकारने या वर्षीच्या सर्व परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोठ्या शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यास क्रमासाठी घेण्यात येणारी प्रवेश परिक्षा (NEET) ही सप्टेंबर मध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

उस्मानाबाद येथे परिक्षा केंद्र नसल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी सोलापूर अथवा लातूर येथील केंद्रांची निवड करावी लागते. परंतु, या दोन्ही शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उस्मानाबाद येथे प्रवेश परिक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी आपल्याकडे केली होती.

यावर्षी उस्मानाबाद ला परिक्षा केंद्र न दिल्यास नाईलाजास्तव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सोलापूर अथवा लातूर येथे परिक्षेसाठी जावे लागेल. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संसर्गाचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे, उस्मानाबाद येथे प्रवेश परीक्षा केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. असे निवेदन, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुख यांना दिले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा