बारामती, २० ऑक्टोबर २०२०: बारामती तालुका व शहर पोलीस मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रदूर्भाव वाढू नये यासाठी रात्रंदिवस ड्युटीवर आहेत. यामुळे अनेकवेळा चिडचिड होऊ नये मानसिक संतुलन ढळू नये यासाठी आज मंगळवारी दि.२० रोजी मेडिटेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती तालुका, शहर, एसआरपीएफ जवान, होमगार्ड यांना कामाच्या ताणामुळे जास्त वेळ काम करावे लागते. त्यात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या जबाबदारीने चोवीस तास ड्युटी करावी लागत आहे. कामाचा ताण कमी व्हावा मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतुन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मानसिक तंदुरुस्तीसाठी अमरावती येथील निगेटिव्हिटी व कन्स्लटिंग शिवाजी कुचे यांचे कोरोना व फेबिया मेडिटेशन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बारामती तालुका व बारामती शहर पोलीस स्टेशन, उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी, आरपीएफचे जवान, होमगार्ड यांचे संयुक्त शिबिर भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती तालुका पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, ५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ६८ पुरुष व महिला पोलीस कर्मचारी, एसआरपीएफचे १४ जवान, १६ होमगार्ड शिबिराला हजर होते.
या शिबिराचा पोलिस कर्मचाऱ्यांना ताणतणाव कमी करण्यासाठी चांगला फायदा होईल असे पोलीस शिरगावकर यांनी सांगितले, तर शिबिराबाबत पोलिस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव