जालना ६ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुक-२०२४ च्या पुर्व तयारीच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्था व परवानगी कक्ष, रॅली, प्रचार सभेबाबत आढावा बैठक पार पडली. बैठकीस पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, विदयुत वितरण कार्यालयाचे प्रतिनिधी, उपमुख्य कार्यकारी जि.प. जालना यांचे प्रतिनिधी, तसेच निवडणुक आदेशातील कायदा व सुव्यवस्था तसेच परवानगी कक्ष, रॅली, प्रचार सभा बाबत नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून करावयाच्या कार्यवाहीबाबत मुद्देनिहाय माहिती सांगून सविस्तर कायदा व सुव्यवस्थेबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत पोलीस निरीक्षक यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना वाहन परवाने देण्याबाबत कागदपत्राची सूची कायदा व सुव्यवस्था पथक कक्षास सादर करण्यास सांगितले. तसेच, ऑनलाईन परवाने देण्याबाबत संगणक परिचालक यांच्या तातडीने नियुक्त्या करणे बाबत सूचना देण्यात आल्या. तसेच, जिल्हा परिषद विभागाचे प्रतिनिधी, पोलीस विभाग, विदयुत वितरण विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी/ कर्मचारी यांचा सविस्तर आढावा घेवून त्यांना आपापल्या विभागाशी निगडीत असणा-या कामाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करुन निवडणुक आयोगाचे नियमावली प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात देवून आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी