मुंबई, २ सप्टेंबर २०२२: टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा लवकरच क्रिकेटच्या पीचनंतर आता सिनेमाच्या पीचवर दिसणार आहे. रोहितची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या फोटोमध्ये starting Rohit Sharma असे म्हटले गेले आहे. त्यानंतर मेगा ब्लॉकबस्टर असे मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे आणि ट्रेलर हा ४ सप्टेंबरला रिलिज होईल, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे रोहितचा नवीन सिनेमा येतोय का, असे चाहत्यांना वाटत आहे.
रोहित शर्माने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिलीये. रोहित शर्माच्या या चित्रपटाचं नाव ‘मेगा ब्लॉकबस्टर’ आहे. रोहित शर्मानं त्याचा मेगा ब्लॉकबस्टरमधील लूक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मी खूप एक्सायटेड आहे.’ रोहितच्या या पोस्टला क्रिकेटर सूर्यकुमार यादवनं कमेंट करुन लिहिलं, ‘ये किस लाईन मै आ गये आप?’ रोहितच्या आनेक चाहत्यांना त्याच्या पोस्टला कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
४ सप्टेंबर रोजा मेगा ब्लॉकबस्टरचा ट्रेलर रिलीज होणार आहे. हा चित्रपट असणार आहे की वेब सीरिज ही अजून घोषित करण्यात आलेलं नाही.
रोहित शर्मा व्यतिरिक्त, माजी भारतीय कर्णधार, अनुभवी फलंदाज आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील मेगा ब्लॉकबस्टरमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. आणि कॉमेडियन कपिल शर्मा देखील तिच्यासोबत दिसणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव















































