मेहबुबा मुफ्तींचा रामनाथ कोविंद यांना आहेर…

नवी दिल्ली ;२५ जुलै २०२२ : द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि 24 जुलै रोजी रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द संपुष्टात आली. आज रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदावरून हटताच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी रामनाथ कोविंद यांच्यावर टीकेची झोड उठवली. महबूबा मुफ्ती यांनी यासंबंधी एक ट्विट केले. त्यात म्हणाल्या, आर्टिकल 370 असो किंवा नागरिकत्व (CAA) कायदा असो किंवा अल्पसंख्यांक, दलितांना टार्गेट करणं असतो. त्यांनी भारतीय संविधानाच्या नावावर भाजपाचा राजकीय अजेंडा पूर्ण केला. यापूर्वी महबुबा मुफ्ती यांनी हर घर तिरंगा अभियानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांच्या या आदेशानुसार, जम्मू काश्मीरमधील प्रशासन विद्यार्थी, दुकानदार आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आझादीचा अमृत महोत्सव या उपक्रमाअर्तंगत सर्व नागरिकांना 13 ते 15 ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. भारत सरकारच्या या अभियानाअंतर्गत देशातील 20 कोटी लोकांच्या घरावर तिरंगा फडकवला जाईल. मात्र महबूबा मुफ्ती यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, ‘ आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी साजरा करतो कारण आम्ही स्वतंत्र झालो आहोत. जम्मू काश्मीर हे एक मुस्लिम राज्य असूनही आम्ही पाकिस्तानसोबत गेलो नाहीत. आम्ही सेक्युलरिझमसाठी भारताचा झेंडा स्वीकारला. पण आज हे लोक प्रत्येक घरात घुसून झेंडा लावत आहेत. खरं तर हे लोक भगवा झेंडा मानणारे आहेत. तिरंग्याचा आदर नसणारे लोक आमच्या घरात घुसून झेंडे लावत आहेत, असा आरोप महबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

त्यामुळे राष्ट्रपतीपदावरुन बाहेर पडल्यानंतर लगेचच रामनाथ कोविंद यांना आहेर मिळाला आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा