महिला – पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार : BCCI ची घोषणा

२७ ऑक्टोबर २०२२: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यानुसार महिला आणि पुरुष क्रिकेटर्सना समान मानधन मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी याची घोषणा केली. यासंदर्भात त्यांनी सलग दोन ट्विट केले आहेत.

काय म्हणाले जय शाह ?

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मला जाहीर करण्यात आनंद होत आहे बीसीसीआयने नव्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. अशा स्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मानधन असेल. यापुढे महिलांनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मिळणार ‘एवढे’ मानधन ..

महिला खेळाडूंना किती मानधान मिळणार याची माहिती देताना जय शाह म्हणाले, महिला खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख आणि टी-२० साठी तीन लाख मानधन दिले जाणार आहे.

या निर्णयामुळे आता पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना मानधन देताना केला जाणारा भेदभाव देखील संपवत असून आपण क्रिकेट मध्ये लैंगिक समतेच्या एका नव्या युगात प्रवेश करत आहोत, असेही जय शाह यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा