पुणे, १० नोव्हेंबर २०२०: “ब्रेस्ट कॅन्सर”सहाजिकच हा कर्करोग मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना होतो मात्र, हा पुरूषांना देखील होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सरच्या उदाहरणांमध्ये पुरूषांचं प्रमाण कमी असलं तरी हा कर्करोग त्यांना स्त्रियांच्या तुलनेत अधिक घातक ठरतो.
स्त्रीयांना या कर्करोगाचा धोका अधिक असतो
ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये पन्नाशी पार केल्यानंतर रजोनिवृत्तीची (स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात)लक्षणं दिसू लागलेल्या स्त्रियांचं प्रमाण ९९ टक्के आहे. तरीही आजकाल त्याहून तरुण वयाच्या स्त्रियांमध्येही हा आजार आढळू लागला आहे. ज्या महिलांची रजोनिवृत्ती उशिरा होते, अशांना या कॅन्सरचा धोका अधिक असल्याचं आढळून आलं आहे. यातील मुख्य बाब अशी की, हार्मोन्समधील चढउताराच्या मासिक चक्राशी स्तनांचा किती वेळा संबंध आला, याच्याशी ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता जोडलेली आसते.
ब्रेस्ट कॅन्सर स्त्रीयांचा आजार असल्याची पुरूषांना समज
पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं नेमके कारण अजुनही स्पष्ट नाही, मात्र काही विशिष्ट घटक निश्चितपणे या आजाराला कारणीभूत असल्याचे दिसते. मुळात ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांशी संबंधित आजार असल्यानं आपल्याला त्याचा धोका नाही, असे पुरुषांना वाटत असतं. त्यामुळं छातीमध्ये गाठ जाणवू लागली, तरीही ते ही गोष्ट डॉक्टरांना लगेचच सांगत नाहीत.
पुरुषांची ब्रेस्ट कॅन्सरची गाठ आणि लक्षण थोडं वेगळं असतं
पुरूषांचा छातीमधे उभार तर दिसंल,पण ते स्मूद नाही होत.
वेळेनुसार ती गाठ मोठी होत जाते.
सहसा हा कर्क रोग एकाच ब्रेस्ट ला होतो. (केवळ १% केस मधे हा दोन्ही भागाला होऊ शकतो)
निप्पलच्या खाली किंवा आसपास हा आसू शकतो
निप्पलच्या आजुबाजूला डिंपल या दाणे येऊ शकतात.
या आजारापासून पुरूष असा बचाव करू शकतात.
* वजन जास्त आसेल तर त्याला कंट्रोल करा,शरीराचे वजन योग्य ठेवा.
* नियमित रोज एकतास कसरत करा.
* नेहमी पोष्टीक आणि आरोग्यदायी आहाराचे संतुलित सेवन करा.
* पांढरे पिठ, तांदूळ, साखर, बटाटा खाण्याचे प्रमाण कमी करा, जास्त फायबर आणि लिग्निन चा समावेश करा.
* धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसनं त्याला कारणीभूत ठरू शकतात त्या मुळं हे टाळा.
उशिराची रजोनिवृत्ती हे ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठीचं एकमेव मुख्य कारण असलं तरी याचा अर्थ असा होत नाही कि पुरूषांना होत नाही. ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे अनेक आहेत.त्यामुळे योग्य त्या वेळी आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव