पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री अनंतात विलीन; गृहमंत्र्यांसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली, ३० डिसेंबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी अनंतात विलीन झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आईला मुखाग्नी दिला. गुजरातमधील गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी पंतप्रधान मोदींसह त्यांच्या भावांनी हिराबेन यांना अखेरचा निरोप दिला.

दरम्यान, पंतप्रधान मोदींना मातृशोक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांनी समाजमाध्यमांवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्व पक्षीय नेते आणि मान्यवरांनी मोदींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भावना ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.

अमित शहा यांचे ट्विट :

कॉंग्रेस पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील हिराबेन यांना श्रद्धांजली वाहत कठीण समयी मोदींना बळ मिळो असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीं प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.

प्रियंका गांधी यांचे ट्विट :

तर तुमची आई आमची आई, असे म्हणत ममता बॅनर्जींनी दुःख व्यक्त केले.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ट्विट

पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधानांचे सांत्वन करण्यासाठी गुजरातमध्ये जाण्याची शक्यता आहे.

  • शरद पवार यांचे ट्विट :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदी यांचे सांत्वन केले. नरेंद्र भाई, तुमच्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून मी अतीव दु:खी झालो असे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे संघर्षमय जीवन आम्ही कधीही विसरू शकणार नाही त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे भावनिक ट्विट केले आहे.

  • राज ठाकरे म्हणाले…

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आईच्या मायेचे छत्र गमावणे ह्या इतके मोठे दुःख नाही. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईश्वर बळ देऊ दे. अशी प्रार्थना करीत हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा