पुणे, ६ जुलै २०२३: मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आज थ्रेड्स अॅप लाँच केले. हे अॅप भारतासह १०० हून अधिक देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. बरेच दिवस मेटा या अॅपवर काम करत होता, जे अखेर लॉन्च झाले. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर हे अॅप डाउनलोड होऊ शकते. मेटा ने थ्रेड्स एक स्वतंत्र अॅप म्हणून लाँच केले आहे, परंतु वापरकर्ते इन्स्टाग्रामच्या मदतीने त्यात लॉग इन देखील करू शकतात.
मेटाचे इंस्टाग्राम अॅप हे फोटो-शेअरिंग मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म आहे, तर थ्रेड्स हे ट्विटरसारखेच मजकूर-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही ट्विटर वापरत असाल तर तुम्हाला थ्रेड्सचा त्रास होणार नाही. हे अगदी ट्विटरच्या जुन्या व्हर्जन सारखे आहे. विश्लेषक या अॅपच्या लॉन्चबद्दल उत्साहित आहेत कारण थ्रेड्स इन्स्टाग्रामशी जोडलेले आहेत. यामुळे त्याचा युजरबेस वाढू शकेल आणि जाहिरात देखील चांगली होण्याची शक्यता.
मेटा अॅपचा यूजरबेस वाढवण्यासाठी सर्व कंटेंट क्रिएटर्स आणि सेलिब्रिटींना या अॅपवर आमंत्रित करण्यात आले आहे, तसेच त्यांना दिवसातून दोनदा काहीतरी पोस्ट करण्यास सांगीतले आहे जेणेकरून नवीन वापरकर्ते याला जोडले जाऊ शकतील. सध्या ते ट्विटरएवढे चांगले नाही, परंतु कालांतराने कंपनी त्यात बरेच अपडेट आणेल ज्यामुळे ते ट्विटरला टक्कर देईल.
मेटाचे थ्रेड्स अॅप वापरण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोअरवर जा आणि थ्रेड्स अॅप डाउनलोड करा. इन्स्टॉल केल्यानंतर अॅप उघडा आणि इंस्टाग्राम च्या मदतीने लॉग इन करा. लॉगिन केल्यानंतर इच्छित असल्यास आपण प्रोफाइल पिक्चर, बायो इत्यादी सारखा इंस्टाग्राम डेटा कॉपी करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इन्स्टाग्राम फॉलोअर्सलाही फॉलो करू शकता. सेटअप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ट्विटर प्रमाणे येथे ट्विट्स वगैरे करू शकाल.
न्यूज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर