मुंबई : काही दिवसांपूर्वी एका महिलेनं गायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला होता. आता अशाच आशयाचा आणखी एक प्रकरण समोर आले आहे. संगीत कुमार या ३२ वर्षीय तरुणाने थेट बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन यांचा मुलगा असल्याचा दावा केला आहे.
एवढंच नाहीतर, आपला जन्म हा १९८८ मध्ये झाला. त्यावेळी ऐश्वर्या राय १५ वर्षांची होती. याबाबत एक वृत्त वाहिनीने वृत्त दिले आहे.
याबाबत स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचे नाव संगीत कुमार असे आहे. त्याने दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या राय ही माझी आई असल्याचा दावा केला आहे. माझा जन्म हा आईवीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) द्वारे लंडनमध्ये झाला आहे, असं या तरुणाचं म्हणणं आहे.
संगीत कुमारने असा देखील दावा केला आहे की, ऐश्वर्या राय हिच्या आई-वडिलांनी माझी २ वर्ष देखभाल केली होती. त्यानंतर वडील वेदीवेलू रेड्डी हे विशाखापट्टणम इथं घेऊन आले. तसंच त्याच्या नातेवाईकांनी त्यांच्या जन्मासंबंधीत सर्व कागदपत्र हे नष्ट करून टाकले आहे. जर कागद पत्र असते तर नक्की हा ठोसा पुरावा असता, असंही संगीत कुमारने सांगितलं.
ऐश्वर्या रायचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या संगीत कुमारला आपल्या आई अर्थात ऐश्वर्या राय सोबत मुंबई राहायचं आहे. त्यामुळे आता चित्रपटसृष्टीत एका नवीन चर्चेला उधाण आले आहे.