मी मुख्यमंत्री होणार नाही: शरद पवार

35

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देऊन आपण राज्यात परतणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पवार म्हणाले, की सध्यातरी आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही. पण भविष्यात काय होईल, काही सांगू शकत नाही. आम्हाला अद्याप पाठिंब्यासाठी कुणीही विचारलेलं नाही. त्यामुळे त्याविषयी काही माहीत नाही. शिवसेनेने १७० आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला माहीत नाही’

आताच्या घडीला मतदारांनी आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे. पण आपण काय होईल ते सांगू शकत नाही. पर्यायी सरकार देण्यासाठी आजतरी आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही’, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा